‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह
तत्त्वज्ञानाचे धडे गिरवताना संकल्पनांशी बौद्धिक कबड्डी खेळावी लागते. अनेक संकल्पना बुद्धीच्या कचाट्यात आरामात सापडतात. काही संकल्पना मात्र अश्या असतात की त्या काही केल्या सापडत नाहीत. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, प्रथमदर्शनी अस्तित्वात आहे असे वाटणारी एखादी संकल्पना जवळून ऊहापोह केल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीशी होऊ शकते. दुसरे म्हणजे, त्या संकल्पनेचे अस्तित्व आपल्याला नाकारता येऊ शकत …